ज्वारी आली हुरड्यात तर गहू ओंब्यात, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी)  : गत वर्षाच्या समाधानकारक पावसामुळे यदाचा रब्बी हंगाम उत्तम राहिला आहे. त्यातच यावेळी ज्वारी हुरड्यात, गहू ओंब्यात तर हरभरा फुलोऱ्यात आहे. त्यातच काही ठिकाणी अबा हा मोहऱ्यात आला आहे. असे समाधानकारक चित्र परिसरात असले तरी ढगाळ वातावारणामुळे चिताही व्यक्त केल्या जात आहे.

गतीवर्षी समाधानकारक पाऊस झाला असून परिसरातील शेती हिरवीगार दिसत आहे. त्यात सया रब्बी पिक हगामातील ज्वारो पिक हुरड्यात आहे.  तर गहु ओंब्यात हरभरा फुलाऱ्यात तर अबे मोहऱ्याने लदबदले आहे. परतु ढगाळ वातावरणामुळे या पिकावर प्रादुर्भाव होत आहे. तर ढगाळ नागरिकाच्या बदलामुळे वातावारणामुळेही आरोग्यावर परिणाम होत असून वातावरणातील साथरोगाचा प्रार्दुभाव नागरिकाना होत आहे.